चाहूल

Started by sachinikam, March 23, 2015, 10:25:30 AM

Previous topic - Next topic

sachinikam

चाहूल

हल्ली नाही ठाऊक हरवलय कुठे भान
एरव्ही मंदधुंद वाऱ्याला सुटलय कसल उधान

आजकाल नाही ठाऊक गुंतलय कुठे मन
एरव्ही निरव संथ पाण्यावर उठले कसले तरंग

निळ्या आकाशाची निळाई कुणी मिसळली सागरात
आठवणींने कुणाच्या प्रणयगीते घुसळली काळजात

सरली रात पहात पहात चंद्र पुनवेचा नभात
स्मरली स्वप्नात पहाट गुलाबी, जागली सोनसळी प्रभात

संकेत समजावे कशाचे हे, हवे टाकायला जपून पाउल
वेध कुणाच्या मिलनाचे हे, सये लागली प्रेमाची चाहूल.

----------
कवितासंग्रह : मुकुलगंध
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५



sachinikam

निळ्या आकाशाची निळाई कुणी मिसळली सागरात
आठवणींने कुणाच्या प्रणयगीते घुसळली काळजात

Vaishali Sakat