मुक्तस्पंदने

Started by sachinikam, March 23, 2015, 03:43:08 PM

Previous topic - Next topic

sachinikam

मुक्तस्पंदने

आयुष्याच्या वाटेवर आयुष्य काय ते जगायला
भविष्याची चिंता सोडून दिल्खुलास बागडायला
काहीतरी करायचय नव झुगारून सारी बंधने
एका स्वरात गुंफुदे अपुली मुक्तस्पंदने

फुंकुनि चिंता वाऱ्यावरी करू जोमाने सराव
जिंकायचा आहे आता आपल्याला हा डाव
पाषाणालाही येते देवपण सोसता टाकेचे घाव
अचिंत्य शक्ती दडलीय तुझ्यात असुदे तुला ठाव
उगवत्या सूर्यालाच करती जनमानस वंदने
एका स्वरात गुंफुदे अपुली मुक्तस्पंदने

मोद नवा कणांत मुरला हर्ष नवा क्षणांत विरला
धनतरंग क्षितिजावर पसरले नवचैतन्य दिशांत विखुरले
नाही आता भय कसले चल वेचुया क्षण मंतरले
घेता हाती हात तुझा काळीज कसे गहिवरले
मंत्रमुग्ध एकमेकांत होऊनी नाचूया आनंदाने
एका स्वरात गुंफुदे अपुली मुक्तस्पंदने

----------
कवितासंग्रह : मुग्धमन
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
email: sachinikam@gmail.com


sachinikam

आयुष्याच्या वाटेवर आयुष्य काय ते जगायला
भविष्याची चिंता सोडून दिल्खुलास बागडायला
काहीतरी करायचय नव झुगारून सारी बंधने
एका स्वरात गुंफुदे अपुली मुक्तस्पंदने...

sachinikam

एका स्वरात गुंफुदे अपुली मुक्तस्पंदने