का कुठुन दाटले घन मनात ?

Started by sachinikam, March 23, 2015, 03:52:05 PM

Previous topic - Next topic

sachinikam

का कुठुन दाटले घन मनात ?

का कुठुन दाटले घन मनात ?
कसा पडला काळोख लख्ख उन्हात
का कुठुन पेटला वणवा उरात
कसा अडखळला श्वास  गाताना सुरात

काय कसे हे विपरीत घडले
अघटित सारे शोकसागरात बुडले
का कशी क्षणभर स्पंदने थांबली
सरेना दिन नि रात्र अजूनच लांबली...

का कुठुन दाटले घन मनात ?
कसे गोठले अश्रू तप्त उन्हात
कुठून घोंगावले वादळ काळजात
कसा दुरावला स्पर्श मायेचा
घर करून हृदयात...
घर करून हृदयात...

----------
कवितासंग्रह : मुग्धमन
कवी: सचिन निकम
पुणे
sachinikam@gmail.com