दूर गेली गप्पू - राजेश कामत

Started by Rajesh Kamath, March 23, 2015, 07:14:58 PM

Previous topic - Next topic

Rajesh Kamath

दूर माझ्या पासुन झालीसच कशाला
जर थाबंणार नव्हतीस तर आलीसच कशाला


ठाउक आहे मला, तुला फार कष्ट झlले
माझ्या खुळ्या प्रेमामुळे तुझ्या भावना नष्ट झlले

प्रेम सोसत नव्हते तर माझी झालीसच कशाला
जर थाबंणार नव्हतीस तर आलीसच कशाला


वीस वर्षाचे नाते सहजी कसे विसरणार
ठाउक आहे मला, तू आलीस कि मी परत घसरणार

क्षणात विसरायचे होते तर आठवण आलीसच कशाला
जर थाबंणार नव्हतीस तर आलीसच कशाला



आता जीवनात राहिली
ती फक्त तुझी आठवण
आणी दारूच्या ग्लासामध्ये
माझ्या आसवां‌ची साठवण

आज अशी गत आहे
की मी स्वतःलाच छळतो
मुकाटपणे विष पिउन
आतूनच तळमळतो


नाही आता खंत
तू अशी झालीसच कशाला
आता कधी नाही म्हणनार
तू आलीसच कशाला