दाखउ नाही शकलो कधी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 24, 2015, 11:45:56 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तिच्यासाठी झुरायचे मन
पण सांगू नाही शकलो कधी
ती असायची बसायची आजुबाजुल
पण बोलू नाही शकलो कधी
ती बोलता बोलता डोळ्यात पहायची
वाचायची माझ्या मनातले भाव
पण लपउ नाही शकलो कधी
कित्येकदा तिने खोल पाहिले असेल
पण नजर चोरु नाही शकलो कधी
तीला संशय होता माझ्यावर
माझे प्रेम असणार तीच्यावर
प्रेम होते खुप प्रेम होते पण
दाखउ नाही शकलो कधी
दाखउ नाही शकलो कधी...
...अंकुश नवघरे
.... (स्वलिखित)
सकाळी ११.२८
दी. २४.०३.२०१५