का अजूनही ?

Started by sachinikam, March 25, 2015, 11:36:06 AM

Previous topic - Next topic

sachinikam


का अजूनही ?


का अजूनही सीमेवरती सांडती रक्तांचे सडे
का अजूनही देवळाभोवती गुंफती भक्तांचे वेढे
का अजूनही रानीवनी राबती पामर बापडे
का अजूनही युवापिढी विसरती इतिहासाचे धडे


दिसमास संवत्सरे आली गेली भुईवर
त्याच गरजा त्याच समस्या घोंगावती डोईवर


का अजूनही मिरविती अंधारात लुकलुकणारे काजवे
का अजूनही डरावती डबक्यात अल्पज्ञ बेडके
का अजूनही भटकती सुगंधापाठी मृगकस्तुरी
का अजूनही शोधिशी मानवा देव राउळी मंदिरी


दिसमास संवत्सरे आली गेली भुईवर
त्याच गरजा त्याच समस्या घोंगावती डोईवर


कवितासंग्रह : मुकुटपीस
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sachinikam

धन्यवाद श्रीकांत.

sachinikam

का अजूनही भटकती सुगंधापाठी मृगकस्तुरी
का अजूनही शोधिशी मानवा देव राउळी मंदिरी.