घेतो ओठी लिहूनी ओळी

Started by विक्रांत, March 27, 2015, 07:15:14 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



सरतो काळ
हळूहळू अन
परतून मागे
क्षण येईना

तनमन सारे
व्यापून वेदना
जरी तळमळे
जन्म कळेना

झगमग दुनिया
दिसे भोवती
खरी की खोटी
मज आकळेना

मेणाच्या या
दोन हातांना
सुख धगीचे
अन पेलवेना

असो जगाचे
व्यर्थ सांगणे
शब्दात या 
नसे सांत्वना

घेतो ओठी
लिहूनी ओळी
कधीतरी बघ
भेटेन सुरांना

विक्रांत प्रभाकर