भूत

Started by sanjay limbaji bansode, March 29, 2015, 02:01:31 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

- - - - भूत - - - - - -

माणसे मरतात रोजच मरतात
अपघाताने, आत्महत्याने
विश्वासघाताने, ह्रुदय विकाराने
मंग काय ?
मंग त्यांचे भूत होते.
मुंजा, वेताळ,गिरा,खविस
हडळ,जखीन,डाकिन
असे त्यांचे नामांतर होते !
मंग ते जंगल पकडतात
एखादे झाड पकडतात
एखादा पानवटा पकडतात
एखादा मसनवटा पकडतात
एखादे पडके घर पकडतात
ते दिवसा मात्र कुणाला दिसत नाही
रात्री भीतऱ्याला दिसल्या सिवाय राहत नाही
मंग ते रात्रीच्या किर्र अंधारात बाहेर पडतात
लोकांना विशेष भित्र्यांना सतवतात
त्यांचे मुख्य सण दोन असतात
एक अमावस्या दुसरा पौर्णिमा
या दोन सणाच्या दिवसी हे आपल्या
आवडीच्या माणसांच्या अंगात घुसतात
आणी आपले आवडीचे खाने मागतात
त्यांच्या आवडीचे खाने
कोंबडे, बकरे, पिवळा भात, लिंबू
भुतेच ती,त्यांच्या मनात आले तेंव्हा दिसतात
कधी त्यांना डोकेच नसते
कधी त्यांचे छातीवर डोळे असतात
कधी त्यांची सावलीच दिसत नाही
कधी कधी तर त्यांची पायच उलटी असतात
आता मात्र त्यांना थोडा प्रॉब्लेम झाला
कारण मानवाने त्यांचे घरचं नाहीसे केले
पूर्वीचे जंगल नाहीसे झाले
झाडे तोडली
रात्रीचा अंधार दिवे लाऊन प्रकाशमय केला
मंग आता काय ?
आता चक्क भुते घरातच शिरली
कधी बाथरूममधे
कधी अंधाऱ्या खोलीत
कधी टेरेसवर
कधी बिल्डिंगच्या पाठी
कधी सीड्यावर
आता त्यांनी आपले घर बनीवले





संजय बनसोडे