फेसबुकवरचे मित्र

Started by विक्रांत, March 29, 2015, 07:05:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

फेसबुकच्या आतल्या गल्लीत
माझे चार मित्र राहतात
जे माझी कविता वाचतात
स्वानंदाच्या यात्रेत माझ्या
आणि मला साथ देतात
त्या चार मित्रांसाठी तरी
मला इथे यावे लागते
तसे ते या गल्लीतले दादा आहेत
वर्षोनुवर्ष राहत आहेत
तरी सुद्धा माझे इथे
नित्य स्वागत करीत करतात
पाहुणचाराचे शब्द त्यांचे
मला लाख मोलाचे वाटतात
आणि जर का लिहिलेले
माझे त्यांना नाही आवडले   
प्रेमाने अन मोठ्या खुबीने
न दुखावता ते ही सांगतात 
भेटी गाठी घडत नाहीत 
देणे घेणे काही नसते
जन्मांचे काही नाते असावे
जे शब्दामधून उलगडते

विक्रांत प्रभाकर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]