कळलंच नाही मला...

Started by धनराज होवाळ, April 01, 2015, 01:05:48 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

कळलंच नाही मला,
प्रेम तुझ्यावर कसं झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय केव्हाच तुझं झालं..!!

तुला आधी मैत्रिण मानायचो,
मनसोक्त गप्पा मारायचो..
तुझ्याशी फक्त बोलण्यासाठी,
सगळ्या मित्रांना टाळायचो..!!

रात्रभर गप्पा रमायच्या,
आठवणी तुझ्या भुलवायच्या..
तुझ्या मैत्रीच्या नात्याला,
त्याच प्रेमरुप द्यायच्या..!!

कळलंच नाही गं मला,
कसा तुझ्यावर मी भुललो..
तुझ्या त्या मंजुळ बोलण्यात,
कसा गं मी इतका झुरलो..!!

तुला मी नंबर मागितला,
पण तु दिला नाही..
बर म्हंटलं ठिक आहे,
अभी कोई गल नही..!!

तो पण एक दिवस आला,
त्या दिवशी तुझा कॉल आला..
खुप खुप समजावलंस तु मला,
राजा कसं कळत नाही रे तुला..!!

अजुन ही तेच दिवस आहेत,
तुझ्या मैत्रीचे अन् माझ्या प्रेमाचे..
उद्या तरी तु फक्त माझीच होशील,
याच एका वेड्या आशेचे..!!

खरंच कळलंच नाही गं मला,
इतकं प्रेम तुझ्यावर कसं झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय मात्र केव्हाच तुझं झालं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Prasanna jori



Priya Dhanjani

i jst lyk u r lv poem....
very nyc....:-*
nd #beautiful....

धनराज होवाळ