प्रेमवेडा...

Started by धनराज होवाळ, April 01, 2015, 01:16:19 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

मी प्रेम केलं तुझ्यावर,
ते मनापासुन मनावर..
तु ही केलं माझ्यावर,
हृदयापासुन हृदयावर..!!

रात्रं दिवस गप्पा मारतो,
एकमेकांना खुप आठवतो..
जमलंच कधी दोघांना तर,
बाईकवरुन पण फिरतो..!!

काही वचने घेतलेली,
तु तर काहीच निभावलेली..
त्यातली बरीच मात्र,
अशी अर्ध्यातच राहीलेली..!!

तरीही मी तुला समजुन घेतो,
प्रेमाचे मी तुला धडे देतो..
तु कशीही असलीस तरी,
मी तुलाच माझं सर्वस्व मानतो..!!

कारण तुझ्या वागण्यातसुद्धा,
एक वेगळीच अदा आहे..
म्हणुनच तर हा प्रेमवेडा,
या प्रेमवेडीवर फिदा आहे..!!

कितीही काहीही झालं तरी,
परी तु फक्त माझी आहे..
उगवणाऱ्‍या सुर्याची शपथ,
हा प्रेमवेडा फक्त तुझा आहे...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार