शाप

Started by rudra, November 25, 2009, 10:55:25 PM

Previous topic - Next topic

rudra

शाप आहे मजला की,भोग आहेत जीवनाचे
करत गेलो मी , पापाचे घडे भरत गेले.

का ? मखमली मुठीत घट्ट होत गेलो
जाग येताच हातातील वाळवंट सरत गेले.

पाहतो आहे संसार गंभीर होऊनी मजला
काय अभागी आहे नातेही सोडून गेले .

आता उगा का रडे हताश होऊनी
प्रेमही गेले अन प्राणही विझून गेले.


सुनिल संध्या कांबळी
९८९२२८९१५१






Swan

प्रेमही गेले अन प्राणही विझून गेले. ..very touchy

MK ADMIN