>> "प्रयत्न" <<

Started by धनराज होवाळ, April 02, 2015, 02:40:15 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

खुप प्रयत्न केला मी पण,
तुला विसरणं कधी जमलंच नाही..
तुझ्याशिवाय इतर कुणाचा,
विचार मनात कधी आलाच नाही..!!

नजरेत माझ्या तु,
विचारात सुद्धा तुच आहेस..
हृदयात माझ्या तु,
जीवनात फक्त तुच आहेस..!!

तुझी आठवण काढून,
वेड्यासारखा मी हसतो..
सगळीकडे तुला पाहून,
स्वतःच स्वतःला फसतो..!!

तुझ्याशी बोलण्यासाठी,
खुप झटपटत असतो..
कॉल लागत नाही म्हणून,
फेसबुकवर झटपटत असतो..!!

तरी सुद्धा माझे प्रेम,
तुला खोटेनाटे वाटते..
तुझ्याविणा प्रत्येक क्षणाला,
अश्रू माझ्या डोळ्यांत दाटते..!!

कधीतरी तो ही दिवस येईल,
जेव्हा तु माझ्या प्रेमात पडेल..
खुप आतुरतेने वाट पाहतोय,
जेव्हा आपला प्रेमांकूर घडेल..!!

कधीतरी समजेल तुला माझं प्रेम,
वेड्या मनाची ही आशा आहे..
केली तर तुलाच सुन करेन,
माझ्या आईची ही भाषा आहे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
9970679949
www.facebook.com/Premveda143