चषक सुगंधाचे...

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2015, 02:44:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



चषक सुगंधाचे...

होईल पंचमी पाखरांची
सांगुनी रंगधनु गेला,
ग्रीष्मातही देई गारवा
सडा रंगाचा पसरला !

रंगात सारा रंगांच्या
सृष्टीकर्ता हि उदारला,
नको म्हणता मोहराने
आसमंत पण गंधाळला !

नव पालवीच्या रंगी
वृक्षवृक्ष न्हाउन गेला,
भरूनी चषक सुगंधाचे
घेउनी निसर्ग आला !


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९