Bike

Started by Shivangi, April 02, 2015, 07:13:12 PM

Previous topic - Next topic

Shivangi

Bike म्हणजे तो आणि मी
Bike म्हणजे सुसाट वारा
त्याच्या माझ्या मनात मात्र निश्चल शांती
नाही दुःखास थारा .....

Bike म्हणजे निव्वळ मस्ती
Bike म्हणजे थरार
Bike म्हणजे त्याच्या माझ्या प्रेमाची
एकमेव साक्षीदार .....

Bike म्हणजे त्याने आणि मी
एकत्र अंगावर झेललेल्या सरी
चिंब ओलेत्या मनावर
त्याच्या प्रेमाच्या झालरी ....

आवडतं मला bike वर
त्याच्यामागे बसणं
त्याचं मला आरशातून 
चोरून पाहणं ....

speed  breaker वरून हवेत उडवल्यानंतर
माझं त्याला रागावणं
मग त्याने bike चालवतानाही
माझा हात हातात घेणं

Bike म्हणजे लटका राग
Bike म्हणजे अवखळ प्रेम
Bike म्हणजे त्याची - माझी जवळीक
आणि कधीतरी केलेली आगळीक .... :)

Prem Mandale


pawan kale

Chan.khupach chan.prem he prem asta tumcha amcha same asta