सरू : प्रेम :

Started by Prem Mandale, April 02, 2015, 10:12:11 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

सरू : माझ्यात काय आवडतं?

प्रेम : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत
मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...

सरू : किती प्रेम करतोस माझ्यावर???

प्रेम : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय ? त्या
पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच
प्रेम करतो. जास्त नाही...

सरू : मला कधी विसरशील?

प्रेम : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य
उगवायचा थांबला ना कि विसरेन...

सरू : कधी आठवशील मला?

प्रेम : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच
काढेन... पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच
काढेन...

सरू : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल
का?

प्रेम : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर
तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार नाही.
त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून
ठेवावा लागेल...!

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Shivangi