माऊली

Started by गणेश म. तायडे, April 03, 2015, 08:49:26 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे


धन्य धन्य तु माऊली
थोर आहे तुझी सावली
तुझ्या सारखी सर्व
लेकरांना लाभावी आई...
शिकवलास तु आम्हाला
साक्षरतेचा धडा
ऱ्हास झाला असता जर तु
टाकला नसता शिक्षणाचा सडा...
तु खरा जिंकलास
पराक्रमाचा किल्ला
तुझ्या शिकवणीने
नाश दुर्बुद्धीुचा आम्ही केला...
तुच आम्हा लेकरांची
आहे पराक्रमी माता
दे मज तु आशिर्वाद
झुकवितो तुझ्या चरणी माथा...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com