रस्ता सवयीचा

Started by Mangesh Kocharekar, April 03, 2015, 09:06:05 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

             रस्ता सवयीचा     
तुझी मला आताश्या सवय झाल्याय वाटतंय
पायाखाली रस्ता पण मन तुलाच शोधतय
ना ओळख ना बोलण पण काळीज खुणावतंय
तुझ्या माझ्या नाजुक इशाऱ्याना तेहि समजतंय
तुझ गोड हसण बहुदा त्यालाच तर ते भुललय
      वाटेवरच्या खुणांना त्याने आपलस केलय
      तू दिसली नाहीस तर रस्ता सरत नाही
      कामावर गेलो तरी मनच लागत नाही
      कधी तुला पाहीन ह्याची डोळ्यांनाहि घाई
      तुझी प्रतिमाच फिरत असते कल्पनेच्या ठाई
      माझ मात्र चित्त खरच कशातच लागत नाही
तुलाही असच होतंय का ? हे मला कळत नाही !
म्हणुनच तुला विनंती उगाच वेळ बदलू नको
माझ्या हळव्या मनाला विरहात बुडवू नको
रस्ता आपल्या मैत्रीचा खुण गाठ विसरू नको
हरकतीच्या मुद्यावर प्लीज कधी घसरू नको
नजरेच्या संवेदनेला प्लीज पोरक करू नको