नजरेची जादू

Started by Mangesh Kocharekar, April 03, 2015, 09:08:41 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

           नजरेची जादू             
तुझ्या एका नजरेसाठी दिव्य मी काहिही करीन
तू  फक्त इशारा कर उभा कडा जवळ करीन
तुझ्या ओठावरच हसू हीच खरी माझी ऊर्जा
तू फर्मान काढलस तर हसूनही मी भोगेन सजा

आव्हान,आव्हान नसेल,जर असेल तुझी सोबत
फक्त माझ्या नजरेस उगा नको घेवू  हरकत
तुझ्या डोळ्यांच्या पापण्यात कोंडून मला पाहू दे
निळ्याशार नेत्रांच्या सागरात थोडस विसावू दे

तुझ्या कुरळ्या संभाराचा गंध भरून घेवू दे
तुझ्या कपाळी ओठांचा टिळा मला लावू दे
तुझ्या नेत्रांच्या आरशात प्रतिबिंब शोधू दे
तुझ्या र्हीदायीच्या पाखराशी गुजगोष्टी सांगू दे

माझ्या मैत्रीच्या पतंगाला प्रेमाच हव आभाळ
तुझ्यासाठी बांधेन मी स्वप्नवत प्रेमाचा महाल
तुझ्या स्मिताचा एक कटाक्ष माझ्यासाठी किरण ठरेल
बीज प्रेमाचे आसुसलेले तुझ्या नजरेनच अंकुरेल