हाक

Started by शिवाजी सांगळे, April 04, 2015, 03:48:04 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हाक

गुलाल केशर फुलवित पाचु
फिरूनी बघ वसंत आला !

गगणी धरूनी फेर रंगाचा
आसमंत तो पुन्हा रंगला !

सजवुन फांदि पानं फुले
साज नवा निसर्ग ल्याला !

चमचम पाने उन्हा सोबत
कळीही देतसे साथ फुलां !

हाक ऐकूनी आर्त माझी
ये भेटाया त्वरीत मला !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९