व्यथा

Started by श्री. प्रकाश साळवी, April 07, 2015, 07:55:28 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

            व्यथा
माझ्या व्यथांच्या लक्तरांचे बांधले महाल मी
आसवांच्या हिंदोळ्यावर ढेपाळले जीवन मी
एकेक ऋतूला पाचारले कितिदा तरी
नाहीच बहरलो वसंतात एकदा तरी मी
दू:ख हे माझ्या पाचविला पूजलेले
जहर हे प्राशून तरीही राहिलो जिवंत मी
या व्यथांनो कितीदा तरी मला त्रासण्याला
एकेक दू:ख पचवित ऊरून राहिलो मी
कितीही काढा वाभाडे माझ्या या व्यथांचे
भ्याडपणांच्या हल्ल्याने ना कधी हरणार मी
श्री.प्रकाश साळवी
दि. 04/04/2015