भुक्कड स्वप्ने

Started by विक्रांत, April 07, 2015, 10:03:08 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

काय साली भुक्कड स्वप्ने
इथे पाहिली आहे मी
प्रेमासाठी चक्क गटारी 
वस्ती केली आहे मी

उगाच जळलो रात्रंदिनी
क्षणोक्षणी जागुनी मी
अन सुखाची प्रेतं छिन्न 
उंच लटकावली आहे मी 

तिची नजर होती फक्त
फुगत्या बँक बँलंसवरी नि
कंगाल होवुनी जिंदगी ही
वाया घालविली आहे मी

रे सुटुनी हातातील सारे
उभा नग्न भिकारी मी
आता नको करुणा कुठली 
ती वस्ती सोडली आहे मी

विक्रांत प्रभाकर


सुरेश

टीप -

"उभा नग्न भिकारी मी" ही ओळ कोणी वाच्यार्थाने न वाचता लाक्षणिक अर्थाने वाचायची आहे.