मज तो जोती हवा !

Started by sanjay limbaji bansode, April 11, 2015, 11:15:08 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

थोतांड मुखी बडबडणारा
नको तो भिक्षुकी थवा !
ज्ञानाची जोत पेटवीणारा
मज तो जोती हवा ! !

चुल आणी मूल सोडून
स्त्रीला दिली दिशा नवी !
ती स्त्री क्रांतिकारी मज
जोतिबाची सावित्री हवी ! !

रंजल्या गांजल्या त्यांनी
दाखवीला खरा स्वर्ग !
शूद्र अतिशुद्रासी त्या
खुला केला ज्ञानाच्या मार्ग !
मनुवादाला गाडून उरलेला
होता तोची खरा मर्द !

उघड्या नागड्याच्या झोपडीत
लावीला ज्ञानाचा दिवा !
ज्ञानाची जोत पेटवीणारा
मज तो जोती हवा ! !

अस्पृश्य समाजाला पाण्याविना
तरसवीले सर्वांनी !
स्वतःच्या घरातील तेंव्हा
खुले केले पाणी !
माणूस तुम्ही, नव्हे जनावर
जंग छेड़ा मर्दानी !

झटून दलितांच्या हक्कासाठी
दाखवीला मार्ग नवा !
ज्ञानाची जोत पेटवीणारा
मज तो जोती हवा ! !

सता ना जाती कुणी
पण जात होत्या सती !
स्त्री जातीला छेळण्याची
होती ब्राम्हणी मती !
कोंडली होती घराच्या आत
अन्याय झाला तिच्यावर अती !

काढून तिची पहिली शाळा
प्रकाश दिला तीला नवा !
ज्ञानाची जोत पेटवीणारा
मज तो जोती हवा ! !


संजय बनसोडे
9819444028