मी प्रेम करत नाही तुझ्यावर !

Started by Prem Mandale, April 14, 2015, 10:04:44 AM

Previous topic - Next topic

Prem Mandale

मी प्रेम करत नाही तुझ्यावर !

मी प्रेम करत नाही तुझ्यावर !
पण होय तु मला आवडतेस.
याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो.
मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं.
कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं.
याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम
करतो.
कारण, आवड नी प्रेम यात फरक आहे.
आवड मर्यादीत.
म्हणुनच त्याला विशेषणांची गरज आहे.
उगाच का म्हणतो आपण,
थोडं आवडतं जास्त आवडतं.
कधी म्हणताना ऎकलंय ?
माझं थोडंसच प्रेम होतं !
पण प्रेम ? प्रेम म्हणजे?
आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं,
आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं !
मग वाट कशीही असो,
काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही.
आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं
असंतर मला कधीच वाटलं नाही.
म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही.
पण, तु मला आवडतेस.
तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं !
नव्हे.. तर तुझ्या असण्यामुळं.
होय, तुझ्या असण्यामुळं.
नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा.
सोबत असण्यामुळं.
हे जास्त बरोबर आहे.
बस्स ! अशीच सोबत रहा.
कारण
तु मला आवडतेस

#Alone_Kills

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref