यातनेच्या हुंदक्यात

Started by sanjay limbaji bansode, April 23, 2015, 12:07:02 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

होते मूल उपाशी
म्हणून घेतली फाशी
नका दोष देऊ मला
येऊन माझ्या दाराशी
यातनेच्या हुंदक्यात
चालली अंत्ययात्रा माझी ! !

मी गेल्यावर संसाराचे काय ?
हे मला ही ठाव होतं
ऋण, कष्ट, उपासमारी
याचच मोठं घाव होतं
हरेक सावकाराच्या डायरीत
माझच एक नाव होतं
शेवटी मरणाबरोबरच केली
मी सौदेबाजी
यातनेच्या हुंदक्यात
चालली अंत्ययात्रा माझी ! !

चिल्या पील्या मुलांना
शिकविण्याची हौस होती
पण दरवर्षी सावकाराची
माझ्या घरासमोर फौज होती
माझे मुले पडक्या घरात अडाणी
त्यांच्याच मुलांची मौज होती
घालायला कपडे नाही
मंग कसली आशा शिक्षणाची
यातनेच्या हुंदक्यात
चालली अंत्ययात्रा माझी ! !

दुष्काळाने अन् कर्जाने
होतो दरवर्षी वाकडा
सरकार मात्र मोजतय
आमच्या मरणाचा आकडा
दारासमोर पाण्याचा नाही,
पडतो आमच्या अश्रूचा सडा
गरीब शेतकऱ्यांच्या घरी जन्मा आलो
एव्हढीच चूक माझी
यातनेच्या हुंदक्यात
चालली अंत्ययात्रा माझी ! !


संजय बनसोडे
9819444028