भूकंप

Started by sanjay limbaji bansode, April 28, 2015, 06:00:15 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

आकाशाचे बघून जमीन ही नडली
तांडव करीत तिने, घरे दारे पाडली ! !

गरीब श्रीमंत चिल्यापील्याचा, बनली ती कर्दनकाळ
आक्रोशाने तिच्या, हादरले सारे नेपाळ ! !

पापीवंत पुण्यवंत ना बघितले तिने कुणा
असो कोणत्याही जातीचा मारला त्याला फणा ! !

पावसासारखीच आता लागली जमिनीला खोड
कोण जाने आता, निसर्ग घेईल कोणता मोड ! !


संजय बनसोडे
9819444028