दगड होऊन जन्मु दे

Started by Ravi kamble, April 29, 2015, 01:22:12 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

* दगड होऊन जन्मु दे *

जन्म झालाच पुन्हा 
तर दगड होऊन जन्मु दे
पाषाणाला कोरुन
देह रेखीव माझा घडु दे

पिकवुन कष्टाने सारे
शेतकरी सदैव उपाशी
दगड होऊन जन्मलो
तर खाईन सदैव तुपाशी

चिंतेने माय व्याकुळ
कधी मिळेल दुध बाळाला
दगड होऊन जन्मलो
तर कमी नाय इथ अभिषेकाला

जगने झाले मुश्किल
ना वास अंगा गंधाचा
दगड होऊन जन्मलो
तर सहवास मिळेल चंदनाचा

आयुष्य सरले तरी
हाती सदा अंगार
दगड होऊन जन्मलो
तर चढेल सोन्या चांदीचा साज शृंगार

कितीही धरती फाटली
वा कितीही पुर वादळ वाहिल
दगड होऊन जन्मलो
तर सदैव आबादित राहील

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)