त्यांचा पश्चाताप …

Started by AKSHAY BHALGAT, April 29, 2015, 03:43:09 PM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

खरंच कुठेतरी चुकतो आपण ...
जिवनात ..., आपल्याच माणसांना मुकतो आपण ...
नडतो आपलाच अहंकार आपल्याशीच ...,
म्हणूनच तर ,
आपल्याच चुका भोगतो आपण !     (१)

समोरच्या शब्दाला शब्द वाढवतो आपण ...
आपल्याच शब्दांवर पश्चाताप करतो आपण ...
ठरत शहाणपण आपल ..., माती खाल्याजोग ...
म्हणूनच तर ,
आपल्याच हातांनी " शेण " खातो आपण !    (२)

पुढ नीट वागायचं ..., हे हि ठरवतो आपण ....
नवीन रूढी , नवीन परंपरा अवलंबतो आपण ...।
पण काही केल्या ., अंगातला " किडा " जात नाही ....
म्हणूनच तर ,
सरळ चालण्यासाठी जगाला वळण लावतो आपण ... !

अक्षय भळगट
२९.०४.२०१५
http://maitrin1athavan.blogspot.in/2015/04/blog-post_29.html