कंप

Started by Rajesh khakre, April 29, 2015, 06:54:31 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

कंप

निसर्गापुढे, परिस्थितिपुढे
किती माणूस लाचार
कधी भूकंप ,अवकाळी पाऊस
कधी वादळ,कधी दुष्काळ

एरव्ही माणसाला अहंकार बुद्धिचा,
दोन बुके शिकलेल्या ज्ञानाचा
पदरी असलेल्या पैशाचा
जवळ असलेल्या पदाचा

अस काही घडलं की जाणवतं
माणूस मारुदे कितीही बोम्बा
मोठेपणाच्या,शुरपणाच्या
पण तो एक खेळणेच
या सृष्टीच्या व्यवस्थेचा

स्वतः च्या यत्किचित सामर्थ्यावर
देतो कधी देवालाही आव्हान
तु आहेस की नाही सिद्ध कर एकदा
देव हसतो मनातल्या मनात

कुणी देतो देवालाही शिव्या
तु जर आहेस तर का अस होतं
कुंभाराला नसतं फुटलेल्या मडक्याच
फारस दुःख हे प्रत्येकाला माहीत नसतं
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com