महाराष्ट्र देवा

Started by sanjay limbaji bansode, May 01, 2015, 06:12:38 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

साऱ्याला वाटेल आमुचा हेवा
असा जागवू आम्ही मराठी ठेवा !

अखंड करीन तुझीच रे सेवा
नमन तुझ माझे, हे महाराष्ट्र देवा !

मराठीमुळे आम्हां,किर्ती लाभली
तुझीच लेकरे, आम्ही शोभली !

तुझेच काव्य अंगी संचारी
रसाळ करीन,तुझी कडी कपारी !

दिलास तू आम्हां,मार्ग हा नवा
नमन तुज माझे, हे महाराष्ट्र देवा !


संजय बनसोडे
9819444028