शिवबाचा छावा

Started by sanjay limbaji bansode, May 14, 2015, 07:19:54 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

बलाढ्य शूर वीर, हजारो पराक्रम त्याच्या नावा
पकडण्यास त्याला औरंग्या,करी अल्लाचा धावा
शूद्र असुनी लिहला त्यानी,संस्कृत ग्रंथ नवा
दाही दिशा होता, फक्त त्याचाची गवगवा
शिवबाचा छावा तोची शिवबाचा छावा ! !

धर्म त्याचा हिंदू ,स्वराज्य केंद्रबिंदू
दहा हत्तीचे बळ, मन प्रेमळ परंतु
मातृभूमिचा सदैव,  गाई तो गोडवा
शिवबाचा छावा तोची शिवबाचा छावा ! !


शूरांची त्याची भाषा, ज्ञानाची त्यासी नशा
शिकल्या होत्या त्यांनी सोळा सोळा भाषा
पराक्रम अन् शौर्याचा लावीला मातीत या दिवा
शिवबाचा छावा तोची शिवबाचा छावा ! !


साचले रक्ताचे तळे, जरी काढीले डोळे
करून बंदिस्त तया, तो औरंग्या छेळे
जाता जाता दिला आम्हां, मर्दानी मार्ग नवा
शिवबाचा छावा तोची शिवबाचा छावा ! !


संजय बनसोडे
9819444028