पुतळ्याची व्यथा

Started by Shirish Edekar, May 18, 2015, 02:55:19 PM

Previous topic - Next topic

Shirish Edekar

पुतळ्याची व्यथा

पुतळ्याना आवडतो पावसाला,
कारण होत नाही रंग त्यांचा काळा,
पुतळ्याना आवडतो पावसाला,
कारण त्यांच्या डोक्यावर बसत नाही कावळा,
पुतळ्याना आवडतो पावसाला,
कारण कुत्र्याला लागत नाही आमचा लळा,
उन्हाळा, हिवाळा, नसे कोणावेळ क्षणभर थांबायला,
त्यापेक्षा आपला पावसाळा बरा, चुकून-माकून कोणतरी येतो आडोशाला,
माझा चबुतरा लव बर्डचा मळा, त्यांना नाही कृतूंचा  अडथळा,
पण वात्रट कुठले, माझ्याच पाठी बसून, मला दाखवतात वाकुल्या,
उन्हाळ्या पेक्षा बरा असे हिवाळा,
पण आम्हाला आवडतो बाबा पावसाळा..

शिरीष.....