रंग वेदनेचे

Started by शिवाजी सांगळे, May 19, 2015, 07:46:10 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रंग  वेदनेचे ...

थकल्या तारकांचे मळे
होउन क्षीण मंदावले,
गंभीर धीर डोहावर
तेंव्हा तरंग झंकारले!

तप्त सुर मैफलीतले
कसे एवढयात शमले?
पडसाद त्या सादांचे
आसमंती कसे विरले?

थेंबभर शाईनेच जेव्हा
मांडले शब्द मनातले,
रंग वेदनेच्या आठवांचे
तेव्हा आपसुक विखुरले !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९