Gambhir Kavita

Started by Shirish Edekar, May 19, 2015, 10:49:43 AM

Previous topic - Next topic

Shirish Edekar

सुख – दुःखाच्या वाटेवरती..........

चंदनाला झिझायाचे कसल दु:ख
त्याला आहे सुगंध देण्यातच सुख,
मेणबत्तीला वितळायच कसल दु:ख
तिला आहे अंधारात वाट दाखवण्यातच सुख,
झाडाला तळपत्या सूर्याच कसल दु:ख
त्याला लोकांना सावली देण्यातच सुख,
चंद्राला त्याचावरील डागांचे कसल दु:ख,
शीतल प्रकाशात, प्रेमिकांचा साथी होण्यातच त्याला सुख,
नदीला सागर मिलनाचे कसल दु:ख
तिच्या प्रवासात, दोन्ही काठ सुफलाम करण्यातच तिला सुख,
इंद्रधनुला नसे त्याच्या अस्तित्वाचे दु:ख
सप्तरंगाची उधळण करण्यातच त्याचे सुख,
क्षणभंगुर आयुष्य जगण्याचे फुलपाखराला कसले दुख
आपल्या विविध रंगाने मोहून टाकण्यातच त्याला सुख,
सुख आणि दु:ख नाण्याच्या दोन बाजू
केंव्हा कुठल दान पडेल कुणी न जाणे,
सुख आहे अळवावरच्या पाण्यासारख
घरंगळत पाण्याशी एकरूप होईपर्यंत ते आपल,
तर दु:ख असत गोचडी, तिला ओरबाडूनच काढावं लागत...

शिरीष ७-११