"ह्रदय माझ हरवल आहे"

Started by स्वप्नातली परी, May 19, 2015, 10:58:10 AM

Previous topic - Next topic
#स्वप्नातली_परी...❤️ 

हृदय माझं हरवलं आहे
कसं काय हो विचारता?
कल्पना मलाही नाही
तुम्ही बाकीचंच उरकता...

थोडी मदत करा ना
ते शोधायला मला
जास्त काही नाही बस्स्स..
सांगुन या त्याला...

असं कसं नकळत बरं
माझं हृदय घेऊन गेला
स्वतःचं पण दिलं असतं
तर कळलं असतं मला...

बैचेनी होती आता माझी
हृदयतर हरवून टाकलंय
हरवलंय ज्याच्या मध्ये
त्यालाही चांगलच कळलंय...

शोना वाचून बघ तु
कसा खुदकन हसतोयस
स्वतःच हृदय देऊन टाकू
हाच विचार करतोयस ??

हृदय माझं हरवलं आहे
कसं काय हो विचारता
कल्पना मला ही नाही
तुम्ही बाकीचंच उरकता...

             (स्वलिखित)

Visit my page(https://­m.facebook.com/­profile.php?id=164111­0716124899)