एकटा जीव सदाशीव......

Started by शितल, May 20, 2015, 02:42:28 PM

Previous topic - Next topic

शितल


होतो एकटा-एकटा
ना फिकीर ना तमा
ना कुणाची काळजी
फिरे बनून मी छावा

माझ्या मागोमाग पोरी
कशा मुरडत चाले
बोलायला माझ्या सवे
करी काहीतरी चाळे

जेव्हापासून झालो दोन
रोज वाजतो हा फोन
वाटे फेकून तो द्यावा
वाजे सारखी रिंगटोन

झाली फसगत माझी
काळ गेला तो सरूनं
रोज कामावर जातो
बैल-गाढवं  बनून ......



शितल .......