…… इच्छा………

Started by शितल, May 21, 2015, 06:04:13 PM

Previous topic - Next topic

शितल


कधी कधी आठवणींच आभाळ भरून येतं
रडावसं वाटत नाही तरी डोळ्यांत पाणी येतं

कधी कधी मन बंड करून उठतं
जाती-धर्म ज्यांनी बनवला
त्यांना फासावर चढवावस वाटतं

कधी कधी उगाच पोरकट व्हावसं वाटतं
लहान मुलांसारखे चाळे करावे असं वाटतं
त्याचं मन इतकं मासूम असतं कि
कधी कधी लहानच व्हावसं वाटतं

कधी कधी खूप लिहावसं वाटतं
मनातील भावना वाचता याव्यात असं वाटतं
हात ही बंद पडतो, मस्तक ही स्थिर राहतं
तरी सुद्धा पान शाईने रंगावं असं वाटतं


शितल...