यक्ष प्रश्न !!

Started by श्री. प्रकाश साळवी, May 22, 2015, 02:28:26 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

यक्ष प्रश्न !!
जगायचे कसे? मजपुढे प्रश्न यक्ष आहे
जागलेल्या क्षणांना "ईतिहास" साक्ष आहे
दिसतात मजला काल-राक्षस आ-वासलेले
तयांच्या पुढे मी हीन-दीन भक्ष्य आहे
इमले, महाल, माड्या हे सारेच मोडलेले
घ्यावा ईथे विसावा, ऊघडी एक गवाक्ष आहे
ऊभ्या आडव्या वाटा जिभल्या दाऊन गेल्या
न संपणा-या खगात विहरतो एकाक्ष आहे
मात्र जगायचे जगणे जिव लाऊन आता
ध्येय हे सा-या जगाचे अंतिम "मोक्ष" आहे
श्री.प्रकाश साळवी
21-05-2015