तु

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:11:19 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

माझ्या हाकेची तु गं किती बघतेस वाट,
उभ्या आयुष्यातच राहते फक्त तुझीच साद,
सांगू कसे प्रिये तुला तुझ्या त्या निरागस मनानेच केली
माझ्या आयुष्यात प्रेमाची पहाट.
भास होतो सदा तुझ्या सोबत असण्याचा,
भान ही हरवत तुला माझी म्हणताना,
कसे समजावू तुला किती मी अगतीक
तुझ्याविना मी नाही माझा मीच क्षुल्लक.
वाटते तु माझी असताना विसराव सार,
त्यातच आठवुन देते कधी दु:ख अन् भांडणाची किनार.
Moregs