गुडी

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:37:43 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

आला पुन्हा एकदा हा कोरडाच पाडवा,
भेगा-भेगांतून शेत लागली ओकाया.
होती नव्हती ती पालवी पुन्हा लागली सुकाया.
उभ्या रानात मावेनात,
क्रूर आसवांच्या झळया,
झाडा-झाडांतुन हसु लागल्या,
उभ्या उपाशी जनावरांकडे पाहुन
बाप ढगाशी भांडतो असा कसा तुझा न्याय,
पाप करत कोण? कोण सोसत हे आंदण,
सांग ढगाराया जनावरान काय प्याव?
वारा मोकाट वाहला ढग नभात झोपला,
आस पावसाची येता गाव-गाव सुखात पडला.
एक अक्रीत घडल
एका दमात वादळं घरा-घरांत घुसल,
किती अनैतिक वावटळ,
त्याच्या जोरान तिच भाग्याचं कुंकू पुसलं,
एका तडाख्यात झोपडी झाली होत्याची नव्हती,
दिसा लावल्या घरापुडची,
उतरविली ती गुडी संध्याकाळी...
Moregs