स्ञीभ्रूण हत्या...

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:48:04 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

माणस शिकली पण समाज हुकला,
ऐशो-आरामाच्या जीवनात
सत्य स्विकारायच विसरली,
ना आई, ना बाप ना दुसरे कोणी,
सगळेच म्हणतात पाहिजे मुलगा,
मागतात तर कुणाला?
त्याच स्ञी रुपी महिलेला..
मुलगी नको मुलगाच हवा,पण वंशाचा दिवा वाती विना चालेल का कधी?
कटकट नको पण धाक असावा,
चिंता नको म्हणत-म्हणत शेवट उजाडावा,
शिकुनही लोकं का गिरवतात तोच पाढा?
बलदंड तिच्या त्या असण्यावर नाही कुणाचा विश्वास ,
कष्टाची माऊली ती
वीरश्रींची माता ती,
थोर विभूतींची प्रेरणाही तीच
का बरे नको वाटते ती?
शिवबां साठी जिजाऊ होत्या,
आंबेडकरांच्या भिमाई होत्या, रणांगणात रक्त सांडवणार्या त्या लक्ष्मीबाईही महिलाच होत्या,
सत्या असे हे का लपवाले?
जगी नवनिर्मितीचे स्थळ दुसरे कोणते?
अहंकार तो तोडून सगळा,
समजावा माणुसकीचा आरोळा
ऐकू येत नसेल तरीही ऐका,
त्या चिमुकलीचा गळा.....
Moregs