' किरण '

Started by शितल, May 23, 2015, 03:29:12 PM

Previous topic - Next topic

शितल


एक कळी होती कोमेजलेली
स्वताच्याच जीवनाशी रुसलेली
सूर्याला आली तिची द्या
प्रकाश थोडा दिला तिला
का? कुणी एवढा आपलेपणा दाखवावा
हा प्रश्न पडला तिला
घाबरली ती या नात्याला
सोबत चालून भर रस्त्यात
सोडणार तर नाही ना मला?
या विचाराने ती पुन्हा कोमेजली
पण सूर्याने तिची समजूत काढली
प्रेमाचा हात पुढे करून
आयुष्यभराची साथ मागीतली
दिला कळीनेही त्याच्या हातात हात
म्हणाली तुझ्यामुळेच होईल
रोज माझी प्रभात...... 


शितल...

lakshmikant

ह्रदयस्पर्शी .....!!!!

शितल