काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय…….

Started by शितल, May 26, 2015, 03:59:05 PM

Previous topic - Next topic

शितल

निघून ये तिथून, प्रेम गेले ते विरून
असं त्याला थोडं समजवायचं मी ठरवलंय
काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय.......

याद बनतील ढग, दाटून येईल मग
बरसत्या अश्रूंना साठवायचं मी ठरवलंय
काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय.......

मुके-मुकेच राहून, शब्द जातील वाहून
त्यांना आज अर्थ द्यायचं मी ठरवलंय
काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय.......

मरण येईल ज्याक्षणी, त्याला टांग देऊनी
तुझ्या सवे थोड जगायचं ठरवलंय
काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय.......

अजून थोडे दिसं, हे पाखरू वेडे पीस
तुझ्या घरट्यातून उडायचं ठरवलंय
काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय....... 

तुला होईल हा भास, परतेल देण्या त्रास
आता शब्दांनीच हात जोडायचं ठरवलंय
काळजाने माझ्या दूर जायचं ठरवलंय.......
:( :( :(

शितल .........

शितल


Manoj Dhote


शितल