स्वप्न

Started by indradhanu, December 06, 2009, 01:51:43 AM

Previous topic - Next topic

indradhanu

स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली,
फुलली दश दिशांना नवखी पाहत लाली,
मी कल्पिल्या सुखांचा फुलला वसंत न्यारा
चाहूल मिलनाची दुरून मनात आली,
स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली //१//

अनमोल त्या घडीने उठले मनी तरंग
स्पर्शून स्वप्न गेले हळुले मुके विहंग
कुंजातल्या कळ्यांना हलकेच जाग आली
स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली//२//

साक्षीस घेऊन तो तव बोलका इशारा
स्वप्नसावे सुखाचा पाहिला  मी किनारा
ती नजरभेट आता नयनात स्वप्न झाली
स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली//३//  

MK ADMIN

Nice i liked below lines
साक्षीस घेऊन तो तव बोलका इशारा
स्वप्नसावे सुखाचा पाहिला  मी किनारा