रमाई माता

Started by sanjay limbaji bansode, May 28, 2015, 09:31:54 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

एकदा रमाई वंचित मुलांच्या वसतिगृहात गेल्या असता तिला समजले वसतिगृहात मुलांना अन्नच नाही, तेंव्हा तिने स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व  तिथल्या शिक्षकांना मुलांसाठी अन्न आणण्यास सांगितले.
अशी माझी रमाई माता


जरी गरिबीचा पाठी घाव
तरी प्रेमळ तिचा स्वभाव
दिन दलितांची आई होती
रमाई तिचे नावं !!


खंबीरपणे उभी होती
बाबासाहेबांच्या पाठी
बाबाच्या शिक्षणासाठी
राहिली उपाशीपोटी !
ती नसती तर नसते दिसले
आम्हां भीमरावं
दीन दलितांची आई अशी
रमाई तिचे नावं !!


सोसल्या कित्येक कळा
लागल्या गरीबीच्या झळा
लावीला दीन दुबळ्यांना लळा
फुलला नव कोटीचा मळा !
बाबाही धन्य झाले
बघून तिचा स्वभावं
दिन दलितांची आई होती
रमाई तिचे नावं !!



भिकु धुत्रेची लेक
होती दिसाया सुरेख
रामजीची सुन नेक
होती रमाई लाखात एक !
तिच्याच आशीर्वादाने मिळाला
जगी आम्हां वावं
दिन दलितांची आई होती
रमाई तिचे नावं !!


संजय बनसोडे
9819444028