लोडशेडींग हाय...!!

Started by Atul_Dhakne, May 31, 2015, 11:33:45 AM

Previous topic - Next topic

Atul_Dhakne

लोडशेडींग हाय...!!!

कितीही ढवळलं तरी,
दुधावरची हटत नाही साय,
तसचं आमच्या विचारांचं भी हाय,
कारण आमचा संकुचीतपणा काय जात नाय,
का म्हणजे? आमच्या कडे लोडशेडींग हाय...!!

दानशुर तर आम्ही लई मोठे हाय,
सगळ्याच मंदिरातल्या दानपेट्या फुल्ल भरवल्या हाय,
देवाला दिलयं, गरीबाला देऊन फायदा तरी काय?
कारण आमच्या कडे लोडशेडींग हाय....!!

ग्रंथातील ज्ञन फक्त प्रवचनातच ऐकण्यासाठी हाय,
वेडे का खुळे ते अजीबात आचरणात आचरणात आणायचे नाय,
स्वार्थासाठीच लढायचे अन्  स्वार्थासाठीच हलवायचे हात न् पाय
लक्षात नाही का? आमच्या कडे लोडशेडींग हाय...!!

आमच्यासाठी सगळ्यात मोठी देवी लक्ष्मीच हाय,
मात्र आमच्या घरच्या लक्षीम्या  अडगळीलाच  पडलेल्या बर्या हाय,
अन् सावित्रीच्या लेकीत मादकताच  अधिक    दिसते हाय,
अन् हो आमच्या कडे लोडशेडींग हाय...!!

लोडशेडींग,लोडशेडींग ही नेमकी कशाची लोडशेडींग??
लोड, लोड आहे तरी कशाचा जेणेकरून करताय त्याची शेडींग?? 
विवेकाची,श्रध्देची का  निस्वार्थाची वाढलीये  लोडींग??
जेणेकरून पुरोगामी विचारांसोबत यांची पण करताय शेडींग???

अतुल निवृत्तीराव ढाकणे
९४०३५५१७०१