माझ्या आज २ कविता चोरीला गेल्यात…

Started by शितल, May 31, 2015, 05:18:35 PM

Previous topic - Next topic

शितल

माझ्या आज २ कविता चोरीला गेल्यात... यावर काय उपाय आहे कि नाही ......क़ि आम्ही कविता पोस्ट करणं बंद करावं
फेसबुक वरील पिल्लू तुझ्यासाठी काय पण या पेज चे संचालक सागर कावडे यांनी त्या चोरल्यात माझ नाव काढून पेस्ट केल्यात
त्यांनी या बद्दल माफी मागितली पण पुढे काय आता... मला प्रश्न पडलाय मी या पुढे कविता पोस्ट करू कि नको ......
मला खूप वाईट वाटतंय याचं ....... का हे असं करतात ? काय भेटतं कवीच नाव काढून स्वताच नाव लावताना ?
आम्हाला काय फ़ेमस नाही व्हायचं , पण यार तुम्ही अस करता तर ते आमच्या भावना दुखावतात...
त्या आमच्या feelings असतात ज्या आम्ही कागदावर उतरवतो ...... आणि अजून कोणालातरी असाच होत असावं
या अर्थाने त्याचही दुख कमी होण्यासाठी या व्यक्त होण्यासाठी त्या पोस्ट करतो...
आज माझ कविता करण्या पासून मन उडालंय......... 

MK ADMIN

tumchya kavita chaan aahet mhahun tya copy paste kelya jat aahet...krupaya tya mule kavita post karna thmabvu naka...


शितल

Thanks M.K .....
pn yach bhiti mule mi aata paryant kuthech ya post kelya navtya.........

मिलिंद कुंभारे

हळुवार जपलेल्या त्या भावना सहजच व्यक्त होत राहू देत .......तुझी ती एक कविता नेहमीच इथे झळकत राहू दे .....

कविता चोरीला गेली म्हणून कविता लिहायचे सोडू नकोस ......आपल्या भावना लोकांपर्यंत पोहचतात ह्यातच समाधान मानू या ...

मग ते माध्यम कुठलेही असेना .....माझीही एक कविता अशीच चोरीला गेली होती !!!!  :'(

शितल


Vikramsingh

कवितेचे शब्द भले चोरले असतील पण कविता करण्याची कला नाही चोरता येणार....म्हणुन काळजी करू नका .....कविता करत रहा . आपल्या कविता कोणाला तरी आवडतात हेच आपले पुरस्कार आहे.

विकी..

KalpananchaPaus

Hello everyone

I am new member & I had post only one poem just because of worried about the same problem happens with Shital Mam.. 

its safe site for post our Own work ..

Regards
Punam