प्रिय कविताचोरास...!

Started by Rajesh khakre, June 01, 2015, 10:21:04 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre


कविता लिहून पोस्ट करायचीही चोरी झाली
आज पुन्हा एका कवीची कविता चोरी गेली

चोरांनो चोरण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत जगात
नका पाय ठेऊ तुम्ही उगीच कवितेच्या भागात
भावना कशासी खातात हे सांगण्याची वेळ आली
 
सोने चोरा पैसे चोरा आणखी काही चोरा
सवयच नसेल जात तर धान्य-धुन्य चोरा
कविता चोरुन संवेदना नका तुडवू पायदळी

कवीपणाची हौस मित्रा चोरीने भागत नाही
कविता चोरुन भाऊ कुणी कवी बनत नाही
"कविताचोर" नावाचा माझा कवितासंग्रह बनायची वेळ आली !
  --- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(काल एका कविमित्रांच्या 2 कविता चोरी गेल्याचे वाचले.आणि राहवले गेले नाही)

SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!

शितल

Thank you rajesh........
yanchya baddal kitihi lihl tri yanchi savay jail kay?

rakesh madavi

Khup chan rajesh ,base bharpur kavitachor ahet Br ka!

Hreeteish