"अपमान एका स्त्रीचा"

Started by Sachin Mali, June 01, 2015, 01:16:37 PM

Previous topic - Next topic

Sachin Mali

अपमान एका स्त्रीचा

अपमान एका स्त्रीचा आपण नेहमी कसे करतो
उदाहरणच दयायचे झाले तर संदर्भ पार इतिहासातून मिळतो

या अपमानातून सुटली नाही द्रौपदी असो कि सीता
अपमान केल्याने काय होते यावर कृष्णालाही सांगावी लागली गीता

अजूनही होत आहेत स्त्रीचे वस्त्रहरण
का याच साठी मुली जन्म घेतात कि मिळावे "निर्भया" सारखे मरण

अजून किती करुण अंत करणार आहात ''अरुणा '' नावाचा
का आसाच इतिहास वाचला जाईल स्त्री असण्याचा

कुठल्याही घटनेनंतर आपले राजकारणी आणि मिडिया होते नेहमी हजर
अरे पण अश्या घटना घडूच नये म्हणून पहिले बदला आपली नजर

स्त्री साठी बरेच काही करणार आहोत असे नेहमी दिले जाते आश्वासन
पण तरीही का नाही मरत आपल्यातला दुस्शासन

स्त्रीचा अपमान करण्याची सुरवात करतो आपण तिच्या जन्मापासून
आई मुलगी बहिण बायको किती नाती अपुरी राहतील तिच्या वाचून

कुठलीच आई शिकवत नाही चुकीचा संस्कार
मग का नाही वाईट वागतांना येत एकदा तिचा विचार

अपमान एक स्त्रीचा आपण अजून किती दिवस करणार आहे 
माणूस म्हणून जगण्याचा तिलाही अधिकार आहे
माणूस म्हणून जगण्याचा तिलाही अधिकार आहे


सचिन माळी
Ph: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Read My Other Poems On :- ''http://malisachin.blogspot.in/"