"माझी मुलगी"

Started by Sachin Mali, June 02, 2015, 03:20:58 PM

Previous topic - Next topic

Sachin Mali

"माझी मुलगी"

माझी मुलगी म्हणजे आहे माझा श्वास
आम्हा दोघानाही हवा नेहमी तिचा सहवास

माझी मुलगी  मला मिळालेला देवाचा आशिर्वाद
तरीपण अजूनही समाजात मुलगी नको मुलगाच पाहिजे असा घातला जातो वाद

माझी मुलगी माझ्यासाठी आहे लक्ष्मीचे रूप
तिचा जन्म जेव्हा झाला आनंदाने सुखावलो खूप

तिच्या येण्याने माझे घर झाले जसे वृंदावन
तिच्या प्रतेक गोष्टीने जिंकले सगळ्याचे मन

हळू हळू माझी मुलगी मोठी होऊ लागली
मुले किती लवकर मोठे होतात चाहूलही नाही लागली

एके दिवशी ती सहज मला म्हणाली बाबा मी आता जाणार 
मन एकदम घाबरले आता मी एकटाच कसा जगणार

आपल्याकडे समाजात तर एक रीतच आहे
लग्न करून कन्यादान करताना बापाचे सत्व पाहे

कोण म्हणते बापाला कधीच त्रास होत नाही
माझी मुलगी दूर जाताना ती कळ सोसवणार नाही
ती कळ सोसवणार नाही

सचिन माळी
Ph: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Read My Other Poems On :- ''http://malisachin.blogspot.in/"